ज्याप्रमाणे हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली! त्याच प्रमाणे स्वाभिमान जागृत ठेवून अखंड समाज योग्य ध्येयासाठी एकत्र आला तर समाजात काय आमूलाग्र बदल होतो हे महाराजांच्या इतिहासामधून अखंड हिंदुस्थानाने पाहिले आहे. महाराजांचा हाच वारसा जोपासण्यासाठी शिवबा राजे फाउंडेशन आपल्या परीने खारीचा वाटा म्हणून कार्य करीत आहे! शिक्षणाचा प्रसार प्रचार होऊनही आधुनिक तंत्रज्ञानाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास होऊनही ज्या पद्धतीने समाजातील सर्व वर्गाचा सर्वसामावेशक विकास व्हायला पाहिजे होता तो होऊ शकलेला नाही याचे कारण म्हणजे आपल्याला आपल्या संस्कृतीचा , नीतीमूल्यांचा,थोर पुरुषांच्या मार्गदर्शनाचा, व त्यांच्या इतिहासाचा पडलेला विसर। त्यासाठी शिवबा राजे फाऊंडेशन ह्याच नितीमूल्यांची जपणूक करण्यासाठी कार्य करत आहे. त्यामध्ये शिवसंस्कृती जोपासण्यासाठी शिवकाळातील विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असते.
ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात संसाधनांची कमतरता जाणवत असताना. मी शिक्षणाच्या चांगल्यासाठी सेवा करण्यास वचनबद्ध आहे. नैतिक मूल्ये जोपासण्याचे आणि सामाजिक आणि राजकीय तत्त्वांचे पालन करण्याचे माझे स्वप्न आहे.
जीवन हे आपले अस्तित्व जाणण्यासाठी आहे. शिक्षण आपले अस्तित्व प्रकट करते आणि नशीब उदात्तपणे वळवते. मला प्रत्येक व्यक्तीची खानदानी आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सांस्कृतिक नैतिकता टिकवून ठेवायची आहे.