अभियान १

गाव तिथे वाचनालय.

योजनेचे उद्दिष्टे :
  • ग्रामिण भागातील गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी या योजनेअंतर्गत सहाय्य करणे.
  • स्वंयरोजगाराच्या दृष्टिने विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे.
  • योजनेअंतर्गत विविध क्षेत्रातील अभ्यास करून मिळणाऱ्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना भावी काळात होवू शकेल.
  • विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची अभिरूची निर्माण करणे.
  • योजनेअंतर्गत समाजातील प्रत्येक व्यक्तीला व्यावसायीक कृषीविषयक ज्ञान व मार्गदर्शन करून हया क्षेत्रात ओढ निर्माण करणे, शिवसंस्कृतीचा पाया भक्कम करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समाजात रूजविणे.
अभियान २

फिरती पुस्तक संकलन.

ग्रामीण भागात ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी "गाव तिथे वाचनालय" उभारून, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी शिवबाराजे फाउंडेशन चे प्रयत्न सुरुच आहेत. मात्र या मोहीमेत आपणही सहभागी व्हावे अशी भावना मनात बाळगणार्या समाजबांधवांसाठी "वाचून झालेले ज्ञान, चला करूया दान" या ब्रीदवाक्याला जपत पुस्तक संकलन मोहिमेची सुरूवात करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांच्या कडे असलेल्या पुस्तका दान स्वरूपात शिवबाराजे फाउंडेशनला त्यांच्या कार्यालयामध्ये आणून द्याव्यात किंवा संकलनाची गाडी आपल्या परिसरामध्ये बोलावण्या करीता कार्यालयामध्ये संपर्क साधावा.
अभियान ३

ग्राम स्वयंसेवा.

मोहिमेचे उद्दिष्टे :
  • स्वयंपूर्ण खेडे निर्माण करणे.
  • तरुणांमध्ये श्रमदानाचे महत्व निर्माण करणे.
  • अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून विज्ञानवादी दृष्टकोन निर्माण करणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची अभिरूची निर्माण करणे.
  • शिवबा राजे फाऊंडेशनचे विचार गावा गावामध्ये पोहचविणे.
अभियान ४

जागर शिवसंस्कृतीचा

साप्ताहिक शिवजयंती महोत्सव :

शिवबा राजे फाऊंडेशनच्या माध्यमातून वैचारिक व समाजाला दिशा देणारा महाराष्ट्रातील एकमेव आगळा वेगळा साप्ताहिक शिवजयंती महोत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये समाजप्रबोधनात्मक अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

शिवकालीन युद्धकला :

शिवबा राजे फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचे आयोजन शरीरासाठी उत्तम व्यायाम असलेल्या युद्धकला प्रशिक्षणाला पुन्हा सोनेरी दिवस यावेत. शालेय स्तरावर नियमांच्या भक्कम बांधणीत खेळाच्या स्पर्धा झाल्या तर शिवकालीन युद्धकला महाराष्ट्राचा खेळ म्हणून पुढे येऊ शकला पाहिजे हा छोटासा प्रयत्न. दांडपट्टा, लेझीम, लाठी-काठी , तलवारबाजी यासारख्या शिवकालीन युद्धकला म्हणजे एक रोमांचकारी थरार पाहतेवेळी आपला पूर्वजांचा इतिहास डोळ्यासमोर जागा होतो.

ऐतिहासिक वारसा जतन :

शिवबा राजे फाऊंडेशनच्या माध्यमातून गडकिल्ले प्रदर्शनीचे आयोजन त्याचप्रमाणे गडकिल्ले व ऐतिहासिक वास्तूचे संवर्धनाचे कार्य पार पाडल्या जाते.

शिवव्याख्यान :

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरा घरामध्ये पोहचविण्यासाठी शिवव्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. इत्यादी कामे शिवबा राजे फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असतात.