ग्रामीण भागात ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी "गाव तिथे वाचनालय" उभारून, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी शिवबाराजे फाउंडेशनच्या प्रयत्नांना बळ द्या, आत्तापर्यंत
12
वाचनालये उघडली आहेत.

आम्ही कोण आहोत?

ज्याप्रमाणे हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली! त्याच प्रमाणे स्वाभिमान जागृत ठेवून अखंड समाज योग्य ध्येयासाठी एकत्र आला तर समाजात काय आमूलाग्र बदल होतो हे महाराजांच्या इतिहासामधून अखंड हिंदुस्थानाने पाहिले आहे. महाराजांचा हाच वारसा जोपासण्यासाठी शिवबा राजे फाउंडेशन आपल्या परीने खारीचा वाटा म्हणून कार्य करीत आहे! शिक्षणाचा प्रसार प्रचार होऊनही आधुनिक तंत्रज्ञानाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास होऊनही ज्या पद्धतीने समाजातील सर्व वर्गाचा सर्वसामावेशक विकास व्हायला पाहिजे होता तो होऊ शकलेला नाही याचे कारण म्हणजे आपल्याला आपल्या संस्कृतीचा , नीतीमूल्यांचा,थोर पुरुषांच्या मार्गदर्शनाचा, व त्यांच्या इतिहासाचा पडलेला विसर। त्यासाठी शिवबा राजे फाऊंडेशन ह्याच नितीमूल्यांची जपणूक करण्यासाठी कार्य करत आहे. त्यामध्ये शिवसंस्कृती जोपासण्यासाठी शिवकाळातील विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असते.

अधिक जाणून घ्या

आमची अलीकडेच काही ग्रामीण भागात उघडलेली वाचनालये.

वाचनालयाच नाव : महात्मा ज्योतिबाफुले वाचनालय

वार्षिक उपक्रम.

आमचे नेते

Image placeholder
Image placeholder